परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा, गौर, नरापूर, भाटेगाव, धनगर टाकळी, आलेगाव गावात ३९ मिनिटं गारा आणि जोरदार पाऊस झाला.या घटनेमध्ये तालुक्यात ६ पुरुष आणि तीन महिला जखमी झाल्या असून एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.पावसापासून बचावासाठी त्या शेतातील गोठ्यात जाऊन बसल्या होत्या. माणसांसोबत जनावरेही जखमी झाली आहेत.दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा, नांदेड तालुक्यातील लिंबगाव भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली.विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही गारपिटीचा फटका बसला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews